टोलवरून कॉंग्रेस सोडलीत,
आता भाजपा सोडणार का ?
- आ. प्रशांत ठाकूर यांना सामाजिक कार्यकर्ते
- कांतीलाल कडूंचा जहरी सवाल
- सागरी अटल सेतूवरील फास्ट टॅगमधून
- स्थानिकांची होणार लूट
पनवेल/निर्भीड लेख वृत्त
‘भ्रष्ट वारसा’ असलेले आ. प्रशांत ठाकूर, ‘भुमाफिया’ माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि ‘नारळतोड्या’ फेम गटनेते परेश ठाकूर यांची जन्म, कर्मभूमी असलेल्या गावाजवळून जाणार्या न्हावा शेवा सागरी सेतूवर राज्य सरकारने फास्ट टॅग केंद्र उभारले आहे. मंत्रिमंडळात घेतलेल्या निर्णयात स्थानिकांना टोलमध्ये सवलत देण्याचा कोणताही ठराव पारित न केल्याने आता आ. प्रशांत ठाकूर टोलधाडवरून राज्य सरकारला खडसावत भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देण्याचे धारिष्ट दाखवतील का, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार कांतीलाल कडू यांनी उपस्थित केला आहे.
टोल नाक्याचा मुद्दा उचलून कॉंग्रेसमधून पक्षांतर
- 2014 मध्ये राजकीय पराभवाचे सावट दिसताच खारघर टोल नाक्याचा कळीचा मुद्दा बनवून आमदार प्रशांत ठाकूर यांनी तापलेल्या तव्यावर सत्तेची पोळी भाजून कॉंग्रेस पक्षाचा त्याग केला होता.
- जनभावनेचा प्रश्न असल्याने लोकांनाही भुरळ पडली. त्यातच मोदी लाटेवर स्वार झाल्याने त्यांची नौका तरली. त्यानंतर स्वतः ठाकूर यांनी समाजद्रोह करून पळस्पे जेएनपीटी महामार्गावरील नांदगाव आणि चिर्ले येथील टोलनाक्याचे कंत्राट घेत पुन्हा लोकांना होलसेलमध्ये मूर्ख बनविले.
- तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सायन-पनवेल महामार्गावर टोल नाक्याला परवानगी दिल्यानंतर तेथील पाच गावांतील वाहनांना टोलमधून सूट देण्याची घोषणा केली होती. परंतु, कॉंग्रेसविरोधात राजकीय वारे वाहत असल्याने टोलचे भूत लोकांमध्ये नाचवून कॉंगेस आघाडी सरकारविरोधात रास्ता रोकोतून रणकंदण माजविण्याचे नाटक वठविले होते.
आता राजीनामा देवून पुरुषार्थ दाखवावा!
- आता भाजपाप्रणित महाआघाडीचे सरकार राज्यात आहे. न्हावा शेवा अटल सागरी सेतू न्हावेखाडी, शिवाजी नगर, गव्हाण कोपर, जासई आणि चिर्ले येथून जात आहे.
- न्हावे, गव्हाण, जासई आणि चिर्ले ग्रामपंचायत हद्दीतील सर्व गावांना वाहन टोल भरून प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे स्थानिकांवर टोलनाका लादला जाणार आहे.
- वास्तविक हिवाळी अधिवेशनात यावरून प्रश्न उपस्थित करून पनवेल आणि उरणच्या आमदारांनी सरकारला आधीच इशारा देणे गरजेचे होते.
- परंतु, मिंदे आमदारांना जनतेचे काहीही पडलेले नाही. त्यामुळे त्यांच्यात हे धाडस नसल्याने जनतेची सरकारकडून लूट होणार असल्याचा स्पष्ट इशारा कांतीलाल कडू यांनी देवून आता आ. प्रशांत ठाकूर यांनी खरंच राजीनामा देवून पुरुषार्थ दाखवावा, असे आव्हान कडू यांनी दिले आहे.
भूखंड हडपण्यात ठाकूर आघाडीवर
- सागरी सेतू प्रयोजनानंतर माजी खा. रामशेठ ठाकूर यांनी जवळच सिडकोचे दोन भूखंड हडप केले आहेत. एकावर न्हावेखाडी येथे वादग्रस्त रामबाग उभारली आहे. तर दुसरा भूखंड शिवाजी नगर (शेपटीवरचा मामा) या ठिकाणी मैदान तयार करून वृक्ष लागवड करत ती जागा हडप केली आहे.
- यापूर्वी उलवे नोड होताना शिवाजी नगर येथे गावविस्ताराच्या नावाखाली किमान पन्नास एकर जमिन लाटली आहे. म्हणजे प्रकल्प आला की, ठाकुर घर भरून घेतात. जनतेचा कोणताही विचार करत नाहीत, हे उघड आहे, असे गंभीर आरोप करून ठाकुरांच्या भ्रष्ट कारभाराचे धिंडवडे कडू यांनी काढले आहेत.
- खारघर टोल नाका प्रकरणी लोकांना फसविले होते. आता तो प्रयोग टाळून भूखंड लाटण्याचा उपद्व्याप सुरु ठेवला आहे. मात्र, सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांनी ठाकुरांच्या कारनाम्याची आठवण देत खिंडीत पकडले आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांच्याशीही कृतघ्न!
हिरानंदानी गृहसंकुलांचे काम सुरु असताना तेथील भराव, सपाटीकरणाचे कंत्राट मिळवण्यासाठी ठाकुरांनी पहिल्यांदा ग्रामपंचायत निवडणूक प्रतिष्ठेची करून जिंकली अन् ठेका मिळविला. त्यादरम्यान, टीआयपीएल कंपनीकडून वायूवाहिनी फुटली. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. वायू कंपनीने आक्रमकता दाखवली, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मदतीचा हात देत ठाकुरांना वाचविले. त्याची परतफेड करताना त्यांनाच दोषी ठरवून कॉंग्रेस सोडली. त्याशिवाय काम पूर्ण झाल्यावर खानावळे ग्रामपंचायतीकडे दुर्लक्ष करून ‘गरज सरो वैद्य मरो’ वृत्ती दाखवून दिली.